मोहनथाळ
साहित्य
- बेसन पीठ ३ कप
- तेल ३ चमचे
- दूध ४ चमचे
- मलई १ कप
- तूप १ कप
- साखर १ १/२ कप
- पाणी १/२ कप
- इलायची पावडर १ चमचा
कृती
ताटा मध्ये ३ कप बेसन पीठ घ्यावे, त्यात ३ चमचे तेल, ४ चमचे दूध टाकावे आणि मळून घ्यावे.
कढईमधे १/२ कप तूप व बेसन पीठ टाकावे आणि मंद आचेवर भाजून घ्यावे .
२० मिनिटांनी त्यात मलई टाकावी. पातेल्यामध्ये १ १/२ कप साखर घेऊन त्यात १/२ कप पाणी टाकावे
साखरेचा पाक बनवावा. ताटाला तूप लावावे आणि त्यात साखरेचा पाक व बेसन पीठ टाकावेे. नंंतर १ चमचा
इलायची पावडर टाकावी. हे मिश्रण ताटामध्ये ओतावे आणि त्याच्या वड्या कराव्या.